अखेर तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी टि्वटरवर आपले खाते उघडले. त्यांच्याकडून टि्वटरवर पहिले पोस्ट येण्याआगोदरच २० हजार चाहत्यांनी त्यांना टि्वटरवर फॉलो केले. अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसारख्या अगोदरपासून टि्वटरवर असलेल्या अन्य सेलिब्रिटींच्या यादीत आता रजनीकांत यांचे नावदेखील जोडले गेले आहे.
रजनीकांत यांची पत्नी लता, सौंदर्या व ऐश्वर्या या मुली आणि जावई धनुष यांचे आधीपासूनच टि्वटरवर खाते आहे. ‘कोचादैयन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना टि्वटरवर दाखल झालेले रजनीकांत म्हणाले, टि्वटरच्या माध्यामातून मला चाहत्यांच्या संपर्कात राहता येईल या जाणिवेने मला खूप आनंद झाला आहे. @SuperStarRajini हे त्यांचे अधिकृत टि्वटर हॅण्डल आहे. आपल्याबाबत होणारे मजेशीर संदेश वाचण्यात स्वरस्य असल्याचेदेखील रजनीकांत यावेळी म्हणाले.
महानायक रजनीकांत यांनी टि्वटरवर आपले खाते उघडताच काही क्षणात त्याचा बोलबाला इंटरनेटवर दिसू लागला. अल्पावधीत एक लाखाहून अधिक चाहत्यांनी त्यांना फॉलो केले असून, हा आकडा मिनिटागणिक वाढत आहे. रजनीकांत यांनी टि्वटरवरील संदेशाबरोबर प्रसिध्द केलेल्या व्हिडिओद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्याची इच्छा प्रकट केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
अखेर तमिळ सुपरस्टार रजनीकांत टि्वटरवर दाखल! काही तासांत एक लाखाच्यावर फॉलोअर्स
अखेर तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी टि्वटरवर आपले खाते उघडले. त्यांच्याकडून टि्वटरवर पहिले पोस्ट येण्याआगोदरच २० हजार चाहत्यांनी त्यांना टि्वटरवर फॉलो केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-05-2014 at 08:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally tamil superstar rajinikanth joins twitter