सोशल मीडिया सेन्सेशन आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कपड्यांची अतरंगी स्टाइल आणि रिव्हिलिंग ड्रेस यामुळे उर्फीला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. तर याच फॅशनमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. अलिकडेच तिचं म्युझिक सॉन्ग ‘हाय हाय ये मजबूरी’ प्रदर्शित झालं होतं. पण आता याच गाण्यामुळे उर्फी जावेद अडचणीत आली आहे.

आपल्या बोल्ड-सेक्सी लुक आणि हॉट ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या उर्फी जावेदबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या रिव्हिलिंग कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी कायदेशीर अडचणीत सापडली आहे. रिपोर्ट्सनुसार अलिकडेच तिचे एक गाणे ‘हाय हाय ये मजबूरी’ प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातून प्रमाणाबाहेर बोल्डनेस दाखवल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तीने उर्फीविरोधात दिल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र यावर उर्फीने या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ranveer allahbadia statement row Javed Akhtar poetry comment
रणवीर अलाहाबादिया प्रकरणादरम्यान जावेद अख्तरांची मार्मिक टिप्पणी चर्चेत; म्हणाले, “शिवी ही भाषेतील…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pushkar jog angry over ranveer allahbadia controversial statement
“त्या शोमध्ये अश्लील, अचरटपणा…”, समय रैनावर मराठी अभिनेता भडकला! रणवीर अलाहाबादियाबद्दल म्हणाला, “ही कॉमेडी…”
Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
chhaava movie marathi writer kshitij patwardhan writes aaya re toofan song
मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ सिनेमाचं गाणं! ए आर रेहमानसह पहिल्यांदाच एकत्र काम; म्हणाला, “शब्दरूपी सेवा…”
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…

आणखी वाचा- मुघलांच्या आक्रमणानंतर महिलांवर बंधनं आली; टॉपलेस फोटोवरून उर्फी जावेदची प्रतिक्रिया

उर्फी जावेदचे ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणे ११ ऑक्टोबरला रिलीज झाले होते. या गाण्यात उर्फी रेड कलरच्या साडीमध्ये खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती. उर्फीने गाण्यात किलर परफॉर्मन्स दिला आहे. सारेगमपा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणे अपलोड करण्यात आले असून, या गाण्याला आतापर्यंत ८.६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

उर्फीच्या कामाबद्दल बोलायचं तर २०१६ मध्ये टीव्ही मालिका ‘बडे भैया की दुल्हनिया’ मध्ये अवनी पंतच्या भूमिकेत ती दिसली होती. याशिवाय ती ‘चंद्र नंदिनी’ आणि ‘मेरी दुर्गा’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. २०१८ मध्ये तिने ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी माँ’ आणि ‘डायन’मध्येही काम केलं. २०२० मध्ये उर्फी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काही काळ काम केलं होतं. याशिवाय तिने ‘कसौटी जिंदगी की २’ मध्येही काम केलं होतं. ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाल्यानंतर मात्र ती सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Story img Loader