बॉलीवूडमध्ये हळूहळू जम बसवत असलेल्या पॉर्नस्टार सनी लिओनीविरुद्ध डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सनी लिओनीच्या वेबसाइटवर अश्लील आणि भावना भडकवणारे फोटो आणि व्हिडिओ आहेत, असा आरोप करत तिच्याविरुद्ध गुरुवारी संध्याकाळी अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट) अंतर्गत कलम ६७, कलम ६७ अ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वकिल प्रशांत माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कलमांतर्गत सनीला अटक होण्याची शक्यता असून, पाच वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. तिची वेबसाईट पोलिसांद्वारे बंद केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ‘एक पहेली लीला’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी सूरतमधील एका नागरिकाने सनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी गर्दी गोळा करण्यासाठी सनीचे टॉपलेस फोटो वाटण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता.

Story img Loader