अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला लोकप्रिय टीव्ही रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या सेटवर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ अर्थात फिल्म सीटीमध्ये हा सेट उभारण्यात आला होता. बिग बॉसच्या सेटला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ तिथे पोहोचल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान अचानक घडलेल्या या दुर्घटनेत कोणतीही जिवतहानी झालेली नाही. तसेच आग लागण्याचं कारणही अद्याप समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच या सेटवर बिग बॉस १५ चं शूटिंग सुरू होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉसचा सेट असलेल्या या जागी लवकरच एकता कपूरचा आगामी रिअलिटी शो ‘लॉकअप’चं शूटिंग सुरू होणार होतं. मात्र या माहितीबाबत कोणीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. अभिनेत्री कंगना रणौत ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरवर प्रसारित होणाऱ्या या रिअलिटी शोचं होस्टिंग करताना दिसणार आहे.

Bigg Boss 18 Kamya Punjabi says about Vivian Dsena spiritual
Bigg Boss 18: “आधी महाकालवर खूप विश्वास, नंतर धर्म बदलला…”, विवियन डिसेनाच्या अध्यात्माबाबत काम्या पंजाबीचं भाष्य, म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bigg Boss 18 List Of Richest Contestants In Bigg Boss 18 And Their Net Worth Not Vivian Dsena, This Actress Tops The List
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती
Bigg Boss 18 Karanveer Mehra poking to chahat pandey on relationship
Bigg Boss 18: करणवीर मेहराने रिलेशनशिपवरून चाहत पांडेला डिवचलं, अभिनेत्रीने रागाच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
Bigg Boss 18 kashish Kapoor slam on Shilpa Shirodkar
Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
Bigg Boss 18 salman khan kamya Punjabi slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…
Bigg Boss 18 salman khan slams chahat pandey on weekend ka vaar
Bigg Boss 18: अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ म्हणण्यावरून सलमान खान भडकला, चाहत पांडेचा ‘तो’ फोटो दाखवत केली पोलखोल
Bigg Boss 18 Kashish Kapoor is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फॅमिली वीकमध्ये झालं एविक्शन, चुम दरांगच्या आईची खरी ठरली भविष्यवाणी, ‘हा’ सदस्य झाला घराबाहेर

मागच्या वर्षीही घडली होती दुर्घटना
मागच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बिग बॉसच्या सेटवरजवळ एक दुर्घटना घडली होती. या शोच्या स्टाफपैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता. बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड शूटिंग संपल्यावर घरी जात असताना तिच्या बाइकचा अपघात झाला होता. बाइक स्किड झाल्यानं व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून पिस्ताचा मृत्यू झाला होता. हा अपघात सर्वांसाठीच धक्कादायक होता.

Story img Loader