अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला लोकप्रिय टीव्ही रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या सेटवर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ अर्थात फिल्म सीटीमध्ये हा सेट उभारण्यात आला होता. बिग बॉसच्या सेटला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ तिथे पोहोचल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान अचानक घडलेल्या या दुर्घटनेत कोणतीही जिवतहानी झालेली नाही. तसेच आग लागण्याचं कारणही अद्याप समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच या सेटवर बिग बॉस १५ चं शूटिंग सुरू होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉसचा सेट असलेल्या या जागी लवकरच एकता कपूरचा आगामी रिअलिटी शो ‘लॉकअप’चं शूटिंग सुरू होणार होतं. मात्र या माहितीबाबत कोणीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. अभिनेत्री कंगना रणौत ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरवर प्रसारित होणाऱ्या या रिअलिटी शोचं होस्टिंग करताना दिसणार आहे.

मागच्या वर्षीही घडली होती दुर्घटना
मागच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बिग बॉसच्या सेटवरजवळ एक दुर्घटना घडली होती. या शोच्या स्टाफपैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता. बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड शूटिंग संपल्यावर घरी जात असताना तिच्या बाइकचा अपघात झाला होता. बाइक स्किड झाल्यानं व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून पिस्ताचा मृत्यू झाला होता. हा अपघात सर्वांसाठीच धक्कादायक होता.