‘कौन बनेगा करोडपती’च्या सातव्या पर्वाच्या सुरुवातीलाच त्यांना पहिला करोडपती विजेता स्पर्धक मिळाला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज या इतिहासाच्या शिक्षकाने एक कोटी रुपये जिंकले आहेत.
एक कोटी जिंकल्यानंतर मी करोडपती झालो यावर विश्वासच बसत नाही. सुरुवातीला काही लाईफलाईन शिल्लक ठेवल्याचा फायदा मला झाला, अशी प्रतिक्रिया रंगरेज यांनी दिली आहे. रंगरेज त्यांच्या काही प्रमाणात अंध असलेल्या सात वर्षीय मुलीच्या उपचारासाठी या जिंकलेल्या राशीचा उपयोग करणार आहेत. तसेच, त्यांना एक घर खरेदी करण्याची इच्छा आहे आणि उपेक्षित वर्गातील तीन मुलींना शिक्षण द्यायचे असून, दोन अनाथ मुलींची लग्न करायची आहेत, असेही त्यांनी सांगितले.
केबीसीच्या या भागाचे प्रसारण १५ सप्टेंबरला सोनी वाहिनीवर होणार आहे.
आणखी वाचा