दीपिका पादुकोण तिच्या प्रत्येक चित्रपटात नव्या लूकमध्ये पाहावयास मिळते. आगामी ‘फाइंडींग फॅनी’ या चित्रपटामध्ये ती नव्या लूकमध्ये दिसणार आहे.
होमी अदजानियाच्या ‘फाइंडींग फॅनी’ या विनोदी चित्रपटात दीपिकाने अॅन्जी नावाच्या मुलीची साकारली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये दीपिकाची अदा पाहावयास मिळते. या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात करण्यात आले आहे. मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असलेला ‘फाइंडींग फॅनी’ १२ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

Story img Loader