बॉलिवूडमध्ये सिरियल किसर म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी त्याच्या आगामी चित्रपटात एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्दर्शक विक्रम भटच्या ‘मि. एक्स’ चित्रपटात भितीदायक अवतारातील इमरान प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात इमरान साकारत असलेली व्यक्तीरेखा कशी दिसते आहे, याचे अधिकृत प्रथम दर्शन घडविणारे छायाचित्र चित्रपटकर्ता महेश भट यांनी टि्वटरवर पोस्ट केले आहे. चित्रपटाचे हे प्रथम दृश्य अतिशय भयावह असे आहे, ज्यात डोक्यावर केस नसलेला भितीदायक चेहऱ्याचा इमरान हाश्मी काचेच्या पेटीत ठेवलेल्या उंदरांना न्याहाळताना दिसतो. समाजात घडत असलेल्या अन्याय घटनांविरुद्ध व्यवस्थेशी लढणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका इमरान या चित्रपटात साकारत आहे. विशेष फिल्मस् आणि फॉक्स स्टार स्टुडिओ हे संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या वर्षी १६ फेब्रुवारीला चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होऊन २०१५ मध्ये प्रदर्शित होईल.

Story img Loader