कबीर खानच्या ‘एक था टायगर’ या अॅक्शनपटानंतर कतरिना पुन्हा एकदा नव्या अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. कबीरच्या ‘फॅन्टम’ चित्रपटात ती काम करत असून, सैफ तिच्या प्रियकराची भूमिका करत आहे.

तात्पुरते नामांकित करण्यात आलेल्या ‘फॅन्टम’ चित्रपटातील काही छायाचित्रे कबीर खानने शेअर केली आहेत. मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११ हल्ला आणि जागतिक दहशतवादावर चित्रपटाची कथा आधारित आहे. यात सैफ खासगी संघटनेच्या हेराची भूमिका करत आहे. बैरूत करण्यात आलेल्या चित्रीकरणावेळची सैफ आणि कतरिनाची छायाचित्रे कबीरने ट्विट केली आहेत.

अफगाणिस्तानमध्ये चित्रीकरण केल्यानंतर कबीरने पुन्हा एकदा बैरुतसारख्या खडकाळ अस्थिर स्थानाची निवड केली आहे.

Story img Loader