बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक महेश भट हे बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांनी ‘सिद्धार्थ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास मनालीत सुरुवात केली आहे.

चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता महेश भट यांनी बौद्ध धर्मगुरु रुपातील छायाचित्र ट्विट केले आहे.  “शांततेकडे एक पाऊल पुढे. ” असा संदेश त्यांनी छायाचित्रासह टि्वट केला आहे. आयुष्यात सत्याच्या शोधात असलेल्या पुरुषाची ही कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्श मुकुल मिश्रा करत असून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. यात शिवम भार्गवची प्रमुख भूमिका असून, शाझान पद्मसी त्याची प्रेयसी आणि महेश भटच्या मुलीच्या भूमिकेत आहे.

Story img Loader