अर्जुन कपूर आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या २ स्टेटस या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चेतन भगतने चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला आहे.
फोटो गॅलरीः दृष्टीक्षेप बॉलिवूडच्या आगामी चित्रपटांवर
चित्रपटात अर्जुन कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असून त्यांनी क्रिश मल्होत्रा आणि अनन्या स्वामिनाथन यांच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन याचे आहे. तर करण जोहर आणि साजिद नाडियडवाला यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित असलेला करण जोहरचा आगामी चित्रपट ‘२ स्टेट्स’ १८ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
फर्स्ट लूकः २ स्टेट्स
अर्जुन कपूर आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या २ स्टेटस या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
First published on: 21-02-2014 at 02:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of 2 states