गेली चार वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या ‘जझबा’ या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘जझबा’ चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शिर्षकाला साजेसा ऐश्वर्याचा ‘जझबा’ लूक पोस्टरमध्ये जाणवतो. कान मध्ये सुरू असलेल्या ६८ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील जज्बाचे स्क्रिनिंग होणार असून ऐश्वर्यासह संजय गुप्ता आणि या चित्रपटातील सहअभिनेता इरफान खान देखील स्क्रिनिंगला उपस्थित असणार आहे. इरफान खानसोबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

Story img Loader