बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन , नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन या तिघांचा आगामी TE3N याच चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या तिघांचे प्रथमदर्शनी पाहताना TE3N हा चित्रपट रंजक असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. रिभू दासगुप्ता यांचे दिग्दर्शन असणारा हा चित्रपट सुरूवातीला २० मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, याच्या प्रदर्शनाची तारीख १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, फर्स्टलूकमधील पोस्टर्सवर अमिताभ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी दुचाकी चालवताना दिसत आहेत.

यामधील नवाजुद्दीनचा लूक पाहता त्याच्या TE3N भूमिकेचा बाज आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळा असेल असे दिसते. काही दिवसांपूर्वी हे दोघेजण पश्चिम बंगालमध्ये चित्रीकरण सुरु असताना येथील रस्त्यांवर स्कूटरवरून फिरताना दिसले होते. याशिवाय, अन्य एका पोस्टरवर अमिताभ आणि विद्या बालन एका सरकारी कार्यालयात बसल्याचे दिसत आहे. एकुणच TE3N चा फर्स्ट लूक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of amitabh bachchan nawazuddin siddiqui vidya balan te3n see pics