बॉलीवूडच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित झाला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक मोहवून टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण प्रचंड मेहनत घेत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे या चित्रपटाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. या चित्रपटाचे निर्माते असलेल्या इरॉस कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ऐतिहासिक पोशाखातील कलाकारांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. अभिनेता रणवीर सिंगनेही याबद्दल चाहत्यांशी ट्विटरवरून संवाद साधला . या चित्रपटासाठी रणवीरने शारीरीक मेहनतीबरोबरच भूमिकेचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा