सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. अल्लू अर्जुनपासून रश्मिका मंदान्ना आणि फहद फाजीलपर्यंत सगळ्यांनीच आपली छाप प्रेक्षकांवर सोडली. आता याचा पुढचा भाग ‘पुष्पा २’ ची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचे शूटिंगदेखील जोरात सुरू आहे. नुकताच याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरलाही लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

आता ‘पुष्पा २’च्या सेटवरून अभिनेता फहाद फाजीलचा एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. फहादने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचं स्पष्ट झालं असल्याने चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत. फहाद फाजीलचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची बातमी ट्वीट करत निर्मात्यांनी दिली आहे.

paaru fame Sharayu Sonawane And Shweta Kharat Dance on shahid Kapoor song Saree Ke Fall Sa
Video: पारू आणि अनुष्काचा शाहिद कपूर-सोनाक्षी सिन्हाच्या सुपरहिट गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

आणखी वाचा : तब्बल वर्षभरानंतर ‘मी वसंतराव’ हा चित्रपट येणार ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

फहाद फाजीलने ‘पुष्पा’मध्ये एसपी भंवर सिंह शेखावत या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. शेवटच्या सीनमध्ये फहाद आणि अल्लू अर्जुन (पुष्पा राज) समोरासमोर दिसले होते. या सीनमध्ये भंवर सिंगच्या डोळ्यात धगधगणारी आगच स्पष्ट सांगत होती की दुसऱ्या भागात एक वेगळंच नाट्य पाहायला मिळणार आहे. त्यावेळी तो काही करू शकला नाही, पण आता ‘पुष्पा २’ मध्ये तो बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

“दिग्दर्शक सुकुमार यांना घाईघाईत शुटिंग संपवून ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा नाही आहे. त्यामुळे २०२४च्या मार्च-एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो”, अशी माहिती मध्यंतरी चित्रपटाच्या टीमकडून मिळाली होती. ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय समांथा रुथ प्रभूही चित्रपटात आयटम सॉंग करताना दिसली होती. समांथाचं चित्रपटातील आयटम सॉंगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

Story img Loader