‘संजय लिला भन्साळी प्रॉडक्शन’च्या ‘गब्बर इज बॅक’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने भ्रष्टाचारावर ‘करप्शन इज डेड’ असे कडक ताशेरे ओढत चित्रपटातील प्रमुख अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये मोठ्या धडाक्यात मुसंडी मारली असताना, चित्रपटकर्त्यांनी नवीन पोस्टर प्रसिद्ध केले आहे. यात गब्बरची मुख्य भूमिका साकारणारा अक्षय पाठमोरा उभा असलेला दिसतो. त्याचबरोबर ‘नाम व्हिलन का, काम हिरो का’ असे शीर्षकदेखील या पोस्टरवर झळकताना दिसते. दाढी-मिशी असलेल्या अक्षयचे लूक एकदम रफ-टफ स्वरुपातील असे आहे. त्याचप्रमाणे मार्शल आर्टमध्ये प्रभुत्व असलेला अक्षय या पोस्टरमध्ये फ्लाईंग कीक मारतानादेखील नजरेस पडतो. चित्रपटात अक्षय कुमार एसीपी अजय सिंग राजपूत उर्फ गब्बरची भूमिका साकारत आहे. भ्रष्टाचार मुक्तीच्या कठीण मार्गावर वाटचाल करणाऱ्या शहरातल्या जागरूक नागरिकांच्या एका गटाचे तो नेतृत्व करीत आहे. दिग्दर्शक क्रिश यांच्या या चित्रपटात श्रुती हसन, प्रकाश राज, सोनु सूद, नितिन धीर आणि करिना कपूर यांच्यादेखील भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2015 रोजी प्रकाशित
‘गब्बर इज बॅक’ चित्रपटाचा फर्स्ट लूक : अक्षय म्हणतो, ‘नाम व्हिलन का, काम हिरो का’
'संजय लिला भन्साळी प्रॉडक्शन'च्या 'गब्बर इज बॅक' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने भ्रष्टाचारावर 'करप्शन इज डेड' असे कडक ताशेरे ओढत चित्रपटातील प्रमुख अभिनेता अक्षय कुमार...

First published on: 23-03-2015 at 05:22 IST
TOPICSसंजय लीला भन्साळी
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of gabbar is back akshay kumar says naam villain ka kaam hero ka