‘संजय लिला भन्साळी प्रॉडक्शन’च्या ‘गब्बर इज बॅक’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने भ्रष्टाचारावर ‘करप्शन इज डेड’ असे कडक ताशेरे ओढत चित्रपटातील प्रमुख अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये मोठ्या धडाक्यात मुसंडी मारली असताना, चित्रपटकर्त्यांनी नवीन पोस्टर प्रसिद्ध केले आहे. यात गब्बरची मुख्य भूमिका साकारणारा अक्षय पाठमोरा उभा असलेला दिसतो. त्याचबरोबर ‘नाम व्हिलन का, काम हिरो का’ असे शीर्षकदेखील या पोस्टरवर झळकताना दिसते. दाढी-मिशी असलेल्या अक्षयचे लूक एकदम रफ-टफ स्वरुपातील असे आहे. त्याचप्रमाणे मार्शल आर्टमध्ये प्रभुत्व असलेला अक्षय या पोस्टरमध्ये फ्लाईंग कीक मारतानादेखील नजरेस पडतो. चित्रपटात अक्षय कुमार एसीपी अजय सिंग राजपूत उर्फ गब्बरची भूमिका साकारत आहे. भ्रष्टाचार मुक्तीच्या कठीण मार्गावर वाटचाल करणाऱ्या शहरातल्या जागरूक नागरिकांच्या एका गटाचे तो नेतृत्व करीत आहे. दिग्दर्शक क्रिश यांच्या या चित्रपटात श्रुती हसन, प्रकाश राज, सोनु सूद, नितिन धीर आणि करिना कपूर यांच्यादेखील भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा