माधूरी दिक्षीत ‘गुलाब गँग’ या आगामी चित्रपटात एका धडाकेबाज आक्रमक स्त्रिच्या अवतारामध्ये दिसणार आहे. सामाजिक अन्यायाविरोधात संघर्ष करणाऱ्या ‘गुलाब गँग’ या महिला संघटने पासून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात माधूरीने ‘गुलाब गँग’ च्या प्रमुख महिलेची भूमिका केली आहे.

गुलाबी साडी परिधान केलेली व हातामध्ये लाठी घेतलेली माधूरी या चित्रपटामध्ये निडर व बिन्धास्त दिसते.
या चित्रपटाती़ल स्वत:च्या भूमिकेवर खूष असलेली माधूरी म्हणते ‘गुलाब गँग’मध्ये तुम्ही एका वेगळ्या माधूरीला भेटणार आहात. “तुम्ही पूर्णपणे वेगळी माधूरी पाहणार आहात. मी एका आक्रमक स्त्रिची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामुळे मला काही साहसदृष्ये करण्याची संधी देखील मिळाली”, असे माधूरी म्हणाली.

कठोर भूमिका साकारण्याची माधूरीची जरी ही पहिलीच वेळ नसली तरी स्वत: साहसी दृष्य करण्याची ही तिची पहिली वेळ आहे. या भूमिकेसाठी ४६ वर्षीय माधूरीने कठोर परिश्रमघेतले असून, या चित्रपटातील साहस दृष्यांच्या तयारीसाठी अँक्शन कोरिओग्राफर शिफू कनिष्का शर्माने तिला मार्गदर्शन केले आहे. सहा वर्षांनी माधूरीने पुन्हा एकदा ‘गुलाब गँग’मधून प्रमुख भूमिकेत पुनरागमन केले आहे. सौमिक सेनने ‘गुलाब गँग’चे दिग्दर्शन केले असून, माही गिल आणि शिल्पा शुक्ला या चित्रपटात माधूरी सोबत दिसणार आहेत.

” या चित्रपटामध्ये स्त्रिला रडणारी, बुजरी व सामाजिक अन्यायाला बळी ठरलेल्या भूमिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. हा चित्रपट अतिशय प्रभावी असून, जेव्हा सौमित्रने मला पटकथा वाचून दाखवली मी त्याला नाही म्हणू शकले नाही. मला पटकथा खूप आवडली होती. या चित्रपटामध्ये स्त्रिया प्रमुख भूमिकेमध्ये आहे”, असे माधूरी म्हणाली.
या चित्रपटा द्वारे माधूरी दिक्षीत आणि जूही चावला पहिल्यादाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा