माधुरी दिक्षीतचा ‘गुलाब गॅंग’ आणि बुमन इरानींच ‘संता बंता’ या चित्रपटांचा ट्रेलर ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा हा मकाउ येथे होणार आहे.
अनुभव सिन्हाच्या ‘गुलाब गॅंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सौमिक सेन याने केले असून माधुरी दिक्षीत, जुही चावला, माही गिल, तनिश्था चॅटर्जी यांनी यात भूमिका केल्या आहेत. तर ‘संता बंता’ चित्रपटाचे दिग्दर्शन आकाशदीप सबीर याने केले आहे. चित्रपटात बूमन इरानी हे संता आणि वीर दास, बंताच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच नेहा धुपिया, लिसा हेडन, राम कपूर आणि जॉनी लिवर यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader