बॉलिवूड क्वीन कंगना रणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून या चित्रपटाबद्दल वेळोवेळी नवीन अपडेट्स समोर येत होते. तर यातील कलाकारांच्या भूमिका आणि त्यांचा लूकही एकेक करून आउट केला जात होता. आता नुकताच या चित्रपटातील महिमा चौधरी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
आणखी वाचा : दिलजीत दोसांझच्या आगामी ‘जोगी’ चित्रपटाचा टीझर आऊट, येणार ‘या’ दिवशी भेटीला
अभिनेत्री कंगना रणौत हिने सोशल मीडियावरून हा लूक शेअर केला आहे. महिमा चौधरी या चित्रपाटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. पुपुल जयकर या संस्कृतिक कार्यकर्त्या, लेखिका होत्या. भारत सरकारकडून त्यांना पद्म भूषण या पुरस्करानेही गौरविण्यात आले होते.
महिमा यांच्या आधी या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे हे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले. अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे यांचेही फर्स्ट लूक यापूर्वी आउट करण्यात आले होते. त्या दोघांच्या लूक प्रमाणेच महिमाच्या यांच्या व्यक्तिरेखेलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.
हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
कंगना रणौत स्वतः ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल.