नात्यांपेक्षा पैसा किती मोठा असतो? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. असाच विचार करायला लावणारा ‘पैसा पैसा’ हा आगामी सिनेमा लवकरच येतोय. अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यात प्रमुख भूमिकेत असून या सिनेमाच्या निमित्ताने ते प्रथमच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
‘पैसा पैसा’ सिनेमाचा नुकताच फर्स्ट लूक उलगडला. पैशांची बॅग घेतलेल्या सचितला पाहूनच पैशांभोवती सिनेमाची कथा फिरणार असल्याची कल्पना पोस्टर पाहून येते. जोजी रिचल दिग्दर्शित आणि नाईन फिल्म्स् प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती शिवविलास चौरसिया यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of marathi movie paisa paisa