बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी गॉडफादर आहे. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा अशा बऱ्याच कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये आणलं. अनेकांचे करिअर मार्गी लावणारा हा ‘भाईजान’ आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. सलमानच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटात प्रनुतन झळकणार असून सलमानने या चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे.

मोहनीश बहलच्या मुलीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची माहिती खुद्द सलमानने दिली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सलमानने हे पोस्टर शेअर केलं असून या पोस्टरमध्ये प्रनूतनसोबत नवोदीत अभिनेता जहीर इकबालही दिसत आहे.
प्रदर्शित झालेल्या पोस्टरसोबत चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

‘नोटबुक’ असे शीर्षक असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान करत आहे, तर दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

दरम्यान, या दोन्ही नवीन चेहऱ्यांना घेऊन साकारला जाणारा हा चित्रपट कसा असेल याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे नूतन यांची नात असलेल्या प्रनूतन हिच्याकडून प्रेक्षकांना नक्कीच अपेक्षा आहेत, असं दिसून येत आहे.

Story img Loader