समीर पाटील दिग्दर्शित, दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या धमाल त्रिमूर्तीच्या ‘पोश्टर बॉईज’ने गेल्या वर्षी चांगलेच यश मिळवले होते. ग्रामीण भागात घडणाऱ्या या चित्रपटात नसबंदीवर केलेले हलकेफुलके भाष्य प्रेक्षकांच्याही पसंतीस पडले होते. या चित्रपटाच्या यशानंतर समीर पाटील यांनी ‘पोश्टर गर्ल’चा घाट घातला आहे. मराठीतील ग्लॅम डॉल सोनाली कुलकर्णी ‘पोश्टर गर्ल’च्या भूमिकेत असून याची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘संपूर्ण गावासाठी येकच बस’ ही ‘पोश्टर गर्ल’ची टॅग लाइन चित्रपटाच्या पोश्टरवर दिसते. सामाजिक व्यंगावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेचं १२ फेब्रुवारी २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
poshter-girl-poster
सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ मेनन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. समाजातल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटीलने केले आहे. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं संगीत अमित राजचे आहे.