‘आशिकी २’ अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि ‘हँसी तो फँसी’ अभिनेत्री परिणीती चोप्राच्या आगामी ‘दावत-ए-इश्क’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.
परिणीती आणि आदित्यची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये हे दोघेहीजण रस्त्यावरील खाद्याचा आस्वाद घेताना दिसतात. या चित्रपटाची कथा भारतीय हुंडा प्रणालीवर आधारित आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये जयपुरी मुलीची भूमिका साकारल्यानंतर परिणीती आता ‘दावत-ए-इश्क’मध्ये हैद्राबादी मुलीच्या भूमिकेत दिसेल. ती पहिल्यांदाच आदित्य रॉय कपूरसोबत काम करत आहे. हैद्राबादी मुलगी आणि लखनऊचा मुलगा यांच्या प्रेम कथेत हुंडा विरोधी विषय चित्रीत करण्यात आला आहे.


यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘दावत-ए-इश्क’ चित्रपटाला साजिद-वाजिदने संगीत दिले आहे. हा चित्रपट यावर्षी ५ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

Story img Loader