‘शिमला मिर्ची’ या आगामी बॉलिवूडपटाची काही क्षणचित्रे चित्रपटकर्त्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. राजकुमार राव, रकुल प्रीत सिंग आणि हेमामालिनी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार असल्याचे ही क्षणचित्रे पाहून जाणवते.
ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुनरागमन कले असून, ‘ड्रिम गर्ल’ हेमामालिनी आणि रमेश सिप्पी जवळजवळ ३९ वर्षांच्या कालखंडानंतर एकमेकांबरोबर काम करत आहे. ‘काय पो चे’, ‘शाहीद’ आणि ‘सिटीलाईट’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता राजकुमार राव ‘शिमला मिर्ची’मध्ये रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रीबरोबर दिसणार आहे. सध्या तो मोहित सुरीच्या ‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटात व्यस्त आहे. ‘शिमला मिर्ची’ चे चित्रीकरण संपताच चित्रीकरणादरम्यानचा आनंददायी अनुभव कथन करण्यासाठी चित्रपटातील कलाकारांनी टि्वटरवर धाव घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा