बॉलीवूडची हॉट जोडी रणबिर कपूर आणि दिपीका पादुकोण यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा अयान मुखर्जी दिग्दर्शित प्रेमकथा ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
ही चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक असून, या दोघांनी पुन्हा एकदा यामध्ये धमाल उडवून दिल्याचं दिसत आहे.
दिपीका पदुरकोनने यापूर्वी रणबिर कपूरसोबत २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आता या नवीन चित्रपटात ती ‘गर्ल्स नेक्स्ट डोअर’च्या भूमिकेत दिसणार आहे.
‘ये जवानी है दिवानी’ दिपीका अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसणार असून, नुकत्याच येऊन गेलेल्या ‘रेस-२’ आणि ‘कॉकटेल’ या चित्रपटांप्रमाणे तो फआर ग्लॅमरस नसला तरी साधा आणि सर्वांना आवडणारा आहे.
रणबिर आणि दिपीकाने नुकतंच काश्मिर व्हॅलीमध्ये चित्रपटाचे शेवटचे चित्रिकरण संपवले. ३१ मार्चला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची निर्मिती करण जोहरची आहे.
करण जोहरच्या कोफी विथ करण या कार्यक्रमाच्यावेळी दिपीका पदुकोनने आपण रणबिर कपूरसोबत डेटिंग करत असल्याचं मान्य केलं होतं. मात्र, नंतर काही खाजगी कारणांमुळे हे प्रकरण पुढे सरकू शकलं नाही. आता जवळपास चार वर्षांच्या कालावधीनंतर ते पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे त्यांची केमिस्ट्री कशी असेल यांची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ‘रेस-२’ मधील दिपीकाच्या भूमिकेचं फार कौतुक झालं होतं.   
 

Story img Loader