झोया अख्तरने तिच्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर, अनिल कपूर आणि शेफाली शाह हे तगडे बॉलीवूड कलाकार पाहावयास मिळतील.
चित्रपटाच्या पहिल्या टीझर पोस्टरमध्ये सहाजण क्रूझवर बसून सनबाथ घेताना दिसतात. पोस्टरमधील हे सहाजण चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत असे वाटते. या चित्रपटाची कथा पंजाबी कुटुंबावर आधारित असून याचे चित्रीकरण बार्सेलोना आणि इतर काही देशांमध्ये करण्यात आले आहे. रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि अनुष्का शर्मा हे बहिण-भावाच्या भूमिकेत यात दिसतील. विशेष म्हणजे रणवीर-अनुष्कामधील प्रेमसंबंध संपल्यानंतर ते पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.
एक्सेल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटात राहुल बोस, झरीना वाहब, विक्रांत मेस्सी आणि रिधिमा सूद यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader