‘काय पो छे’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर सध्या ‘फितूर’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रीकरणादरम्यान रेखा यांचा लूक सोशल मिडियावर वायरल झाला आहे.
ट्विटरवरील आदित्य रॉय कपूरच्या फॅनपेजवर त्याच्या एका चाहत्याना हा फोटो पोस्ट केला आहे. या छायाचित्रात रेखा या श्रीमंती पोशाखात झाडाखाली बसलेल्या दिसतात. हा पोशाख मनिष मल्होत्राने डिझायन केला आहे. हा चित्रपट चार्ल्स डिकेंस यांच्या द ग्रेट एक्सपेक्टेशन्स या कादंबरीवर आधारीत आहे. आदित्य रॉय कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. नेहमीच लाल पोशाखात दिसणा-या अविवाहित हविशामच्या भूमिकेत रेखा दिसणार आहेत. त्यामुळे या छायाचित्रात रेखा यांनी लग्नाचाच पोशाख परिधान केल्याची शक्यता आहे. चित्रपटात कतरिना ही आदित्यच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा