बॉलिवूड अभिनेत्री, व्यावसायिक आणि आई अशा विविध जबाबदा-या पेलणारी शिल्पा शेट्टी ‘ढिश्क्यांव’ या तिच्या आगामी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माती झाली आहे. सनी देओल आणि हरमन बावेजा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे युरोपमधील चित्रीकरण पूर्ण झाले असून, १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. शिल्पाने ट्विट केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये साप-शिडीच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या डोक्यावर पिस्तूल रोखलेला हरमन दिसतो. ‘आदमी बडा हो या छोटा… कोई फरक नही पडता बस उसकी कहानी बडी होनी चाहिये.’ चित्रपटाची ही टॅग लाईन चित्रपट कट-कारस्थानांनी भरलेला असल्याचे दर्शविते. १८ वर्षे वयाचा प्रल्हाद मुच्चल या सिनेमाद्वारे चित्रपट संगीताच्या क्षेत्रात प्रवेश करीत असून, आयेशा खान नावाची नवी अभिनेत्री या चित्रपटात काम करत आहे. शिल्पा नवीन प्रतिभेच्या शोधात असल्यासारखे वाटते.
फर्स्ट लूक : ढिश्क्यांव
बॉलिवूड अभिनेत्री, व्यावसायिक आणि आई अशा विविध जबाबदा-या पेलणारी शिल्पा शेट्टी 'ढिश्क्यांव' या तिच्या आगामी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माती झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-10-2013 at 07:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look shilpa shettys production dishkiyaaoon starring sunny deol harman baweja