बॉलीवूडमधले नवखे कलाकार श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ‘द विलन’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.
‘द विलन’ या चित्रपटात श्रद्धा कपूरच्या लूकमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. मात्र, सिद्धार्थ मल्होत्रा हातावर टॅटू आणि दाढी अशा नवीन लूकमध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ म्हणाला की, ” ‘विलन’साठी मी माझ्या लूकमध्ये बदल केला आहे. थोडीशी हेअरस्टाईलही बदलली आहे. दाढी ठेवली आणि हातावर टॅटूही काढला आहे. माझी भूमिका ही आक्रमक आणि प्रखर असून प्रेक्षकांना मी एका वेगळ्या भूमिकेत दिसेन. नुकताच मी साकारलेली प्रियकराची भूमिका आणि आताचा या चित्रपटातील आक्रमक पुरुष यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.”
चित्रपटाचा फर्स्ट लूक संजय लीला भन्सालीच्या ‘राम लीला’ चित्रपटातील रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या पोस्टरची आठवण करून देतो. मोहित सुरी दिग्दर्शित ‘द विलन’ या चित्रपटात रितेश देशमुख, अमृता पुरी आणि कमाल रशिद खान यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २७ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader