धर्मा आणि फॅन्टम प्रॉडक्शनची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘हँसी तो फसी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने ट्विटरवर याचा पोस्टर ट्विट केला आहे.



चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असून, लवकरच याचा ट्रेलरही लाँच करण्यात येईल. या चित्रपटाचे काम शेवटच्या चरणात असून मुंबईतील जुहू बीच येथे या दोघांवर एक गाणे चित्रीत करण्यात येत आहे. विनील मॅथ्यू दिग्दर्शित ‘हँसी तो फसी’ ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader