‘शादी के साइट’ इफेक्ट चित्रपटातील पहिलेच गाणे प्रदर्शित झाले आहे. फरहान अख्तर, वीर दास आणि विद्या बालन यांच्यावर ‘हॅरी इज नॉट ब्रम्हचारी’ गाणे चित्रीत करण्यात आले आहे.
हे एक आनंदी पार्टी गीत आहे. यात फरहानने त्याचे नृत्य कौशल्यदेखील दाखवले आहे. अमिताभ भट्टाचार्य लिखीत आणि प्रितमचे संगीत असलेले हे गाणे जॅझी बी आणि इश्क बेक्टर यांनी गायले आहे. फरहान आणि विद्याव्यतिरीक्त वीर दास आणि राम कपूर यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. बालाजी मोशनची निर्मिती असलेला हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यार के साइड इफेक्ट’चा सिक्वल आहे. ‘शादी के साइड इफेक्टस’ २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader