हिंदी सिनेमात रुजलेला सिक्वेल ट्रेंड आता मराठीतही येऊ लागला असून, भविष्यात ही संख्या वाढणार असल्याची शक्यता चित्रपटसृष्टीत वर्तविली जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एखादा फॉर्म्युला हिट झाला, की त्याचं अनुकरण बाकीच्या चित्रपटसृष्टीतही स्वाभाविकपणे होतं. पण त्याच वेळी पहिल्यांदाच एकत्र दोन्ही सिक्वल चित्रित करण्याचे धाडस “श्री प्रॉडक्शन” प्रस्तुत गिरीशकुमार व अशोक मोकरिया निर्मित मराठी चित्रपट “अतिथि पार्ट १ व अतिथि पार्ट २” द्वारे होत आहे.  या दोन्ही चित्रपटांची कथा, पटकथा व दिग्दर्शनाची धुरा आशिष पुजारी यांनी सांभाळली असून संवाद निलेश भोसले यांनी लिहिले आहेत. तर संगीत धग फेम संगीतकार आदि रामचंद्र यांचे असून गीते गुरु ठाकुर यांची आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणास  कोल्हापूर येथून सुरूवात झाली आहे.
या दोन्ही चित्रपटांमध्ये विजय चव्हाण, अनंत जोग, मिलिंद शिंदे, संजय खापरे, किशोर चौगुले, संजय मोहिते, किशोर नांदलस्कर यांची मुख्य भूमिका असून नयन जाधव, संजीवनी जाधव, प्रशांत तपस्वी, तेजपाल वाघ, रोहित चव्हाण, अनिल नगरकर, मिलिंद ओक, प्रफुल्ल कांबळे,जाई देशमुख,प्रज्ञा चैतन्य,सेवा मोरे,अभिषेक कुलकर्णी, सागर यादव, संदीप वाघमारे, सचिन पाटील आदि कलाकारांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट विनोदी मनोरंजनाची मेजवानी असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतील असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा