नव्वदच्या दशकात आलेल्या अनेक कार्टुन कॅरेक्टरपैकी ‘सिम्बा’ हे कार्टुन कॅरेक्टर विशेष गाजलं. साधरण तेवीस एक वर्षांपूर्वी याच ‘सिम्बा’ कार्टुन कॅरेक्टरवर आधारित आलेला ‘द लायन किंग’ हा चित्रपटही बच्चे कंपनीमध्ये विशेष प्रसिद्ध झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या छाव्याची कहाणी ‘द लायन किंग’ मधून दाखवली.
मात्र, ९० च्या दशकात गाजलेला हा जंगलाचा राजा सिम्बा आजच्या बच्चेकंपनीच्या विस्मृतीत गेला आहे. म्हणूनच डिझ्नेनं ९० च्या दशकातल्या या लोकप्रिय ‘लायन किंग’ला नवसंजीवनी देण्याचं ठरवलं आहे. १९ जुलैला ‘ द लायन किंग’चा रिमेक प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. १९९४ मध्ये आलेल्या मूळ ‘द लायन किंग’चा हा रिमेक असणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली प्रत्येक दृश्य ही जून्या लायन किंगच्या दृश्याशी अगदीच मिळतीजुळती आहे.
July 19, 2019. #TheLionKing pic.twitter.com/ehTudu6wcm
— Walt Disney Studios (@DisneyStudios) November 22, 2018
तंत्रज्ञानाच्या जोरावर हा चित्रपट अधिक प्रभावीपणे पडद्यावर दाखवण्याचा यावेळी डिझ्नेचा प्रयत्न असणार आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकरांनी या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. ‘थॅक्सगिव्हिंग डे’च्या निमित्तानं याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.