बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘हॅपी जर्नी’ चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेता कलावंत अतुल कुलकर्णी आणि ‘काकस्पर्श’मधील अभिनयाचे कौतुक झालेली अभिनेत्री प्रिया बापट प्रथमच एकत्र आले आहेत. तेही भाऊ-बहिणीच्या भूमिकेत.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अतुल आणि प्रियाचे भाऊ-बहिणीमध्ये असलेले अतुट आणि सुंदर नाते पाहावयास मिळते. या दोघांमध्ये नंतर येत असलेले त्यांचे प्रियकर यांचीही झलक पाहावयास मिळते. पल्लवी सुभाष आणि सिद्धार्थ मेनन यांनी अतुल आणि प्रियाच्या प्रियकरांची भूमिका साकारली आहे. हॅप्पी जर्नी’ ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण गोवा, पुणे, वेल्हे आणि मांणगाव अशा विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी एक विशेष गाडीही (हाऊस ऑन व्हील्स) तयार करण्यात आली होती आणि ती चालवता यावी यासाठी अतुलने तशी मेहनतही घेतली. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅपी जर्नी’ १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा