‘बर्फी’, ‘रॉकस्टार’ आणि अलिकडेच आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्यानंतर बॉलिवूडचा उगवता तारा रणबीर कपूर ‘बेशरम’ या अगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो ‘बबली’ नावाच्या मॅकॅनिकची व्यक्तीरेखा साकारत असून, आपल्या अभिनयाने नक्कीच तो अनेकांची मनं जिंकेल, असे दिसते. अनेक फिल्मी संवाद आणि रणबीरची कमालीची अदाकारी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. या चित्रपटात रणबीरचे आई-वडिल ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्यासुद्धा भूमिका असून चित्रपटातील या मध्यमवर्गीय कुटुंबाचा रणबीर हा उनाड मुलगा आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यपच्या या चित्रपटात ऋषी कपूर ‘चुलबुल’ नावाच्या पोलिसाची भूमिका करीत असून, दिग्दर्शक अभिनवचे चुलबुलप्रतीचे प्रेम एका संवादाद्वारे आणखी अधोरेखित होते. ज्यात रणबीर ऋषी कपूरला म्हणतो, “सिर्फ चुलबुल नाम रखलेनेसे कोई दबंग नही बन जाता मोटे.” हा चित्रपट पाहणे नक्कीच मजेदार असणार, असे दिसते. रणबीर, ऋषी आणि नीतूबरोबर जावेद जाफरी आणि पल्लवी शरद यांच्या देखील यात भूमिका आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा ‘बेशरम’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर
'बर्फी', 'रॉकस्टार' आणि अलिकडेच आलेल्या 'ये जवानी है दीवानी' सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्यानंतर बॉलिवूडचा उगवता तारा रणबीर कपूर 'बेशरम' या अगामी चित्रपटात दिसणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-07-2013 at 07:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First trailer of ranbir kapoors besharam unveiled