स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बॉलिवूडच्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. शाहरूख खान, अभिषेक बच्चन, दीपिका पडुकोण, सोनु सूद , बोमन इरानीअशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचा ट्रेलर जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, यासाठी चित्रपटकर्त्यांद्वारे डिजिटल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर याविषयीची प्रसिद्धी करण्यात आली होती. ‘भारतीयत्व’ हा चित्रपटाचा मूळ गाभा असल्याने ‘इंडियावाले’ ही या ट्रेलरच्या अनावरणाची मुख्य थिम होती. यु ट्यूबप्रमाणे ‘व्हॉटस अप’वर देखली या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याचा आगळावेगळा प्रयत्न करण्यात आला आहे.
 

Story img Loader