रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘सिम्बा’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा आहे. ट्रेलर आणि यातील गाण्यांनासुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘सिम्बा’ हा चित्रपट पुढील पाच कारणांसाठी आपण पाहू शकता..

१. रणवीर सिंग- रोहित शेट्टीची जोडी


एकीकडे रोहित शेट्टी मसालेदार चित्रपटांसाठी ओळखला जातो तर दुसरीकडे सतत उत्साहित असलेला रणवीर सिंग. रोहितचं दिग्दर्शन आणि त्या जोडीला रणवीरचं अभिनय हे समीकरण उत्तम असल्याने ‘सिम्बा’ पूर्णपणे रंजक चित्रपट ठरू शकतो.

२. सारा अली खान</strong>


‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खानचा हा दुसरा चित्रपट. ‘केदारनाथ’मधील तिचं अभिनय प्रेक्षकांना आवडलं असून सारा आणि रणवीर ही नवीन जोडी पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

३. ‘सिंघम’ कनेक्शन


‘सिम्बा’मध्ये रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ या सुपरहिट चित्रपटाचं कनेक्शनही पाहायला मिळणार आहे. या कनेक्शनची झलक ट्रेलरमध्येही दाखवण्यात आली होती. याशिवाय अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

४. कॅमिओ


अजय देवगणसोबतच रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ सीरिजची गँगसुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ‘आँख मारे’ या गाण्यात ‘गोलमाल बॉईज’ची झलक पाहायला मिळाली.

५. अॅक्शन

‘टेम्पर’ या तेलुगू चित्रपटावर ‘सिम्बा’ थोड्याफार प्रमाणात आधारित आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट असल्याने अॅक्शन आणि गाड्यांचे स्टंट्स या गोष्टी आवर्जून येतातच. अॅक्शन आणि कॉमेडी यांचं परफेक्ट समीकरण या चित्रपटात पाहायला मिळेल.

Story img Loader