बॉलीवूडचा सर्वाधिक बहुचर्चित चित्रपट ‘धूम ३’ आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बघण्यासाठी तुम्ही का जावे, याची पाच कारणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
‘धूम ३’ चा धूमधडाका
आमिर उवाच!
१. आमिर खान फॅक्टरः
आमिरचे नाव घेतल्यावर काही बोलण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. मि. परफेक्शनिस्ट आमिर त्याच्या भूमिका फार बारकाईने निवडतो. पहिल्यांदाच आपण त्याला खलनायकाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणार आहोत. त्याने चित्रपटात केलेली धाडसी अॅक्रोबॅटिक दृश्ये आणि त्याची पिळदार शरीरयष्टी तुमच्या डोळ्यात भरणारी ठरणार आहे.
धूम ३ : आमिरचे ‘बॉडी-पेन्ट’
२. धूम गर्ल कतरिनाः
चित्रपटाच्या प्रोमोमधून कतरिनानेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. चित्रपटात आमिरसोबत कतरिनासुद्धा काही साहसी दृश्ये करताना दिसणार आहे. आमिर-कतरिना ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे आणि या दोघांमधील केमिस्ट्री पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पाहा : ‘धूम ३’साठी आमिरचा ‘टॅप डान्स’ शिकतांनाचा व्हिडिओ
३. साहसी दृश्येः
धूम हा चित्रपट पूर्णपणे साहसी दृश्ये आणि अतिवेगाने जाणा-या बाइक दृश्यांनी भरलेला आहे. शिकागोच्या रस्त्यांवर आपल्या बॉलीवूड कलाकारांनी केलेली ही जीवघेणी दृश्ये पाहणे तुम्हाला नक्कीच आवडेल.
पाहाः ‘धूम ३’मधील आमिर आणि कतरिनाची अॅक्रोबॅट अॅक्ट तयारी
४. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राः
अभिषेक-उदय या जोडीविना धूम ची सिरीज पूर्ण होणे शक्य झाले नसते. हे दोघेही आधीच्याच म्हणजेच जय आणि अलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पाहा : ‘धूम ३’ चित्रपटातील आमिरच्या परफेक्ट लूकचा व्हिडिओ
५. चित्रपटातील गाणीः
या चित्रपटातील केवळ ३ गाणी आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आली आहेत. पण, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या गाण्यांनी चाहत्यांमध्ये चांगलीच धूम माजवली होती. आमिरचे ‘टॅप’ नृत्य, कतरिनाचा ‘कमली’ अंदाज आणि बॉलीवूडमधले आतापर्यंतचे सर्वाधिक महागडे असलेले ‘मलंग’ गाणे हे प्रदर्शित करण्यात आले होते.

 

Story img Loader