शीर्षक वाचून काहीसे गोंधळात पडलाय काय? पण त्यात मागील काळातील चित्रपट प्रदर्शनाचे खूप मोठे तथ्य आहे. मल्टिप्लेक्स युगापूर्वी चित्रपट प्रदर्शनाचा पारंपरिक फंडा होता. तो म्हणजे मुख्य चित्रपटगृह! रसिकांना आवडलेला चित्रपट तेथे पंचवीस पन्नास आठवडे सहज मुक्काम करे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इंपीरियल’ चित्रपटगृह तसेच. ५ एप्रिल १९१७ रोजी ते सुरु झाले व आजही वयाच्या शंभरीत ते सुरु आहे. मूकपट ते मोबाईल स्क्रीन असा खूप मोठाच कालखंड या वास्तूने अनुभवलाय. ते नेमके कोठे आहे माहित्येय?  दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावर आहे. ते दोन हत्ती नावानेही ओळखले जाते. प्राचीन हिंदू वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणूनही ते ओळखले जाते.

शंभर वर्षांच्या प्रवासात येथे किती, कोणते चित्रपट प्रदर्शित झाले याची गणतीच नाही. बडी बहेन (४९), नास्तिक (५४), काली टोपी लाल रुमाल (५६) असे करत करत बुलंदी (७८) पलको की छॉँव मे (७९) असे असंख्य चित्रपट येथे झळकले. काही दणक्यात यशस्वी ठरले तर अनेक फ्लॉपही झालेत.

भगवानदादांचा ‘अलबेला’(५१) येथेच गाजला. विशेष म्हणजे दादांचे स्टंटपट तोपर्यंत पिला हाऊस भागातील चित्रपटगृहात झळकत. ‘अलबेला’मुळे दादा मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहात आले. ‘अलबेला’ला साठ वर्षे झाल्याच्या निमित्ताने याच ‘इंपीरियल’ला खास खेळाचे आयोजनही झाले.

अमिताभचा सुरुवातीचा पडता काळ याच इंपीरियलने थोपवला. ‘जंजीर’(७३) ने येथेच खणखणीत पन्नास आठवडे मुक्काम केला. अमिताभचे ‘बेनाम’, ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’, ‘हेरा फेरी’चे मुख्य चित्रपटगृह हेच व प्रत्येकाने यश मिळवले. तो मुख्य चित्रपटगृह संस्कृतीचा काळ होता यावरून या यशासह इंपीरियलचे महत्त्व लक्षात यावे.

आता मात्र याच ‘इंपीरियल’ला ‘बी’ वा ‘सी’ दर्जाचे सवंग चित्रपट प्रदर्शित होतात.  शंभर वर्षे कार्यरत असलेली वास्तू हे या ‘इंपीरियल’चे खास वैशिष्ट्य.