हा क्षण ‘हमाल! दे धमाल’च्या रौप्यमोहत्सवी सोहळ्यातील… पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित हा मनोरंजक चित्रपट ५ ऑगस्ट २०१४ ला २५  वर्षे पूर्ण करून आता या वर्षापासून पुढचा धमाल प्रवास करत आहे. खूप खूप अभिनंदन! या चित्रपटाच्या यशात कथा-कल्पना, लक्ष्मीकांत बेर्डेचा ‘हमाला’पासून सुपर स्टारपदापर्यंतचा प्रवास, त्याला हिकमतीने मोठे करणाऱ्या वर्षा उसगावकरची ग्लॅमरस भूमिका, या दोघाना रवीन्द्र बेर्डे, सुधीर जोशी, निळू फुले इत्यादी अनेक कलाकारांची लाभलेली साथ, अनिल मोहिले यांचे लोकप्रिय संगीत, उत्तम प्रमोशन आणि नेटके प्रदर्शन अशा अनेक गोष्टींची छानच केमेस्ट्री आहे. ‘अरे बजरंगाची कमाल’ हे गोविंदा गीत ‘ढाकूमाकूम ढाकूमाकूम’ असा झक्कास ताल धरायला लावते. एका प्रसंगात लक्ष्याची बहिण तिला लग्नासाठी पाहायला येणाऱ्यांसमोर ‘मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जाई’ हे जुने गीत गाते, येथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा