आईची माया ही एक सर्वोत्तम गोष्ट! चित्रपटसृष्टी त्याला अपवाद कशी असेल? पण चित्रपटसृष्टीत आई आणि मुलगी या नात्याकडे पाहताना बऱ्याचदा तरी आई मुलीच्या कारकिर्दीत जरा जादाच रस घेते (अम्मा चक्रवर्ती आणि हेमा मालिनी) अथवा ग्लॅमरस दुनियेत आपलेही अस्तित्व दाखवते (वृंदा रॉय आणि ऐश्वर्या) अशा दृष्टीने पाहिले जाते. एकेका क्षेत्राच्या सवयी असतात. पण तनुजा आणि काजोल यांचे या साऱ्यापेक्षा वेगळे. खरं तर, शोभना समर्थ यांच्या कन्या नूतन आणि तनुजा यांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने आपले स्थान निर्माण केले. आपला पहिला चित्रपट ‘बेखुदी’च्या मुहुर्ताला शोभना समर्थ आणि तनुजा यांच्या सहवासातील काजोल अतिशय कौटुंबिक आणि स्वाभाविक वाटली. (तात्पर्य, ती उगाचचं फिल्मी वा अतिउत्साही वाटली नाही) काजोल आपल्या आजी, आई आणि मावशी यांचा अभिनय वारसा पुढे नेईल हे ‘बेखुदी’त पहिल्या दृश्यापासूनच जाणवले. (तिचा पहिला नायक कमल सदनाह) ‘उधार की जिंदगी’, ‘सपने’, ‘हम आपके दिलमें रहते हैं’ अशा चित्रपटापासून ते सिध्द करतानाच ‘बाजीगर’पासून तिची शाहरुख खानशी जोडी जमली, शोभली. ‘करण अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘कुछ कुछ होता हैं’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले’… काजोल एकीकडे अजय देवगणसोबतच्या सुखी संसारात आणि दोन मुलांच्या आईच्या जबाबदारीत तर पडद्यावर शाहरुख खानशी एकरूप आणि या साऱ्यात आपल्या आईच्या हृदयात. बहिण तनिशासमवेत!… आईने आपल्या मुलीच्या यशात शक्य तेव्हा सहभागही घेतला. या छायाचित्रात ‘हम आपके दिलमें रहते हैं’ च्या यशाच्या पार्टीत या माय लेकी निर्माते डी. रामा नायडूसोबत.
दिलीप ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा