हे छायाचित्र म्हणजे जणू मराठी चित्रपटाचा इतिहास… मराठी चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीत नायिकांचे स्थान खूपच मोठे आणि मानाचे. त्यातील या पाच यशस्वी तारका उमा भेंडे, अलका आठल्ये, जयश्री गडकर, सीमा देव आणि आशा काळे. या प्रत्येकीचा खूपच मोठा चाहता वर्ग आहे. प्रेत्येकीने आपली शैली, लोकप्रियता आणि सातत्य या गुणांनी ठसा उमटवला आहे. समाजात त्याना मानाचे स्थान आहे, त्यांचे किती आणि कोणते चित्रपट का बरे यशस्वी ठरले, या पलिकडे जावून त्यांची ही खूप मोठी खासियत आहे. काही वर्षापूर्वी एका सोहळ्याच्या निमित्ताने त्या एकत्र आल्या त्या अनमोल क्षणाचे हे छायाचित्र.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback marathi actress