एखादा हिंदी चित्रपट दोन-चार वर्षांनी नाव बदलून छोट्या शहरात प्रदर्शित करण्याचा खेळ-मेळ नेहमीचा. अमिताभ-हेमा मालिनीचा प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘नास्तिक’ असाच ‘अर्धम’ नावाने झळकला. मराठीतही असे अधे-मधे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यात ‘नशिबवान’ (१९८८) चित्रपटाची कथाच वेगळी. घरातील मोलकरीणचे (उषा नाडकर्णी) सर्वप्रथम क्रमांकाचे विजेते लॉटरीचे तिकिट तिच्या अज्ञानाचा फायदा उठवत कुटुंबप्रमुख (मोहन जोशी) आपलेसे करतो. पण म्हणून काही त्याला सुख लाभत नाही. अशी अतिशय सरळमार्गी सोपी कथा असणारा हा कौटुंबिक सामाजिक चित्रपट दिग्दर्शक एन. एस. वैद्य यानी साकारला. एन. एस. वैद्य संकलनाकडून दिग्दर्शनाकडे वळले आणि ‘लेक चालली सासरला’ पासून त्यानी आपले वैशिष्ट्य जपले. पण अरुण गोडबोले निर्मित ‘नशिबवान’ ला समिक्षकांनी चांगले म्हटले, तरी प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आशा काळे, मोहन जोशी, नितिश भारद्वाज, अलका कुबल (तोपर्यन्त ती आठल्ये झाली नव्हती), उषा नाडकर्णी, चंदू पारखी, राहूल सोलापूरकर, जयराम कुलकर्णी, बेबी ऋतुजा (मोठेपणीची ऋतुजा देशमुख) अशा नामवंत कलाकारांच्या जोडीला विशेष भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण… सुधीर मोघेंच्या गीताना आनंद मोडकचे संगीत. संगळे कसे जमून आले तरी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येईनात.

काही महिन्यानी हाच चित्रपट नावात बदल करून ‘नशिबवान मोलकरीण’ नावाने प्रदर्शित केला. तेव्हा कुठे थोडेसे नशीब उघडले. कथा चांगली असली तरी चित्रपटाची पहिली ओळख त्याचे नाव… ‘नशिबवान’ निर्मात्याना ते पटकन सुचते.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback nashibwan molkarin
Show comments