सध्या चालू असलेल्या फिफा वर्ल्ड कपचे वेड सर्वांनाच लागले आहे. बॉलीवूड कलाकार असो वा मराठी कलाकार यापासून कोणीच वाचलेले नाही. एका फुटबॉ़ल चाहत्याने चक्क सिद्धार्थ जाधवलाचं फुटबॉलपटू बनवून टाकले आहे. झाले असे की, सिद्धार्थच्या चाहत्याने ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डिन्होचा लूक दिलेला सिद्धार्थचा फोटो ट्विट केला होता. हा फोटो सिद्धार्थने रिट्विट केला असून त्याने म्हटले की, हेहेहेहे… कोणीतरी…. माझा चाहता… माहित नाही..पण फुटबॉल फिव्हर असाच चालू राहील. सिद्धार्थ रुपारेल कॉलेजमधून फुटबॉल टीममध्ये खेळत असे, याबाबत स्वतः सिद्धार्थने टि्वट केले आहे.  सिद्धार्थचा हा फोटो सध्या वॉट्सअॅपवरही फिरत आहे.

 

Story img Loader