बॉलिवूडमधील ‘छोटे नवाब’ सैफ अली खान आणि ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना नजरेस पडू शकतात. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभुदेवा अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाबरोबर ‘एक्शन जॅक्सन’ चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर प्रभुदेवा एका अॅक्शन चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा असून, मुख्य भूमिकेत सैफ अली खान असणार आहे. या चित्रपटात सैफबरोबर काम करण्यासाठी प्रभुदेवाने प्रियांका चोप्राची निवड केल्याचे बोलले जाते. असे झाल्यास सैफ आणि प्रियांकाची जोडी प्रथमच मोठ्यापडद्यावर रोमान्स करताना नजरेस पडेल. असे असले तरी, अद्याप याबाबतचा कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. याशिवाय अन्य एक निर्मिती संस्थादेखील सैफ आणि प्रियांकाला घेऊन चित्रपट बनविण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Story img Loader