Miss World 2024: ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा काल, ९ मार्चला मोठ्या दिमाखात भारतात पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा सोहळा झाला. १९९७ साली ‘मिस वर्ल्ड’चं आयोजन भारतात करण्यात होतं. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी यंदा भारतात ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा पार पडला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हाने ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब पटकावला. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व सिनी शेट्टीने केलं. सिन्नी ही टॉप-८पर्यंत पोहोचू शकली. त्यानंतर टॉप-४च्या स्पर्धेतून ती बाहेर झाली. या सोहळ्याला पूर्वाश्रमीच्या बऱ्याच ‘मिस वर्ल्ड’ सहभागी झाल्या होत्या. यावेळी भारताची ‘मिस वर्ल्ड’ युक्ता मुखी बऱ्याच काळानंतर पाहायला मिळाली. कांचीपुरम सिल्क ब्रॉकेड साडीत युक्ता दिसली. पण युक्ता सध्या काय करते? तिचं आजवरचं करिअर जाणून घेऊयात…

‘मिस वर्ल्ड’ युक्ता ४६ वर्षांची असून तिचा जन्म ७ ऑक्टोबर १९७९ रोजी बंगळुरूमध्ये झाला होता. ती सिंधी कुटुंबातील असून दुबईत ती लहानाची मोठी झाली. १९८६ साली ती मुंबईत आली. १९९९मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब पटकावला. युक्ता मुखी ही भारताची चौथी सौंदर्यवती आहे, जिने ‘मिस वर्ल्ड’ जिंकलं होतं.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

हेही वाचा – आतापर्यंत ‘या’ भारतीय सौंदर्यवतींनी जिंकलाय ‘मिस वर्ल्ड’चा खिताब, वाचा…

Happy Birthday Yukta Mukhi Career: शादी के बाद गुमनाम जिंदगी जी रहीं पूर्व मिस वर्ल्ड, बेरहम पति की मार से तलाक का दर्द झेला | Jansatta
फोटो सौजन्य- जनसत्ता

युक्ताची आई सांताक्रूझमध्ये ग्रूमिंग सलून चालवत होती. तर वडील कपड्याच्या एका कंपनीत व्यवस्थापकीय संचालक होते. ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकल्यानंतर युक्ताने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. २००२ साली ‘प्याला’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदासानीसह ती झळकली. पण तिचे एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप झाले. याचं कारण युक्ताची उंची असल्याचं म्हटलं जातं. ६.१ उंची असलेली युक्ता जास्त काळ सिनेसृष्टीत टिकली नाही. त्यामुळे ती या क्षेत्रापासून लांब झाली.

हेही वाचा – चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली ‘मिस वर्ल्ड २०२४’, भारताची सिनी शेट्टी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या

२००८मध्ये युक्ताने न्यूयॉर्कचा व्यावसायिक प्रिन्स तुलीशी लग्न केलं. त्यानंतर दोघांना एक मुलगा झाला. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघांमध्ये वाद पाहायला मिळाले. २०१३ रोजी युक्ताने पतीविरोधात एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये घरगुती हिंसाचार व छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. याचा खुलासा स्वतः युक्ताने एका मुलाखतीत केला होता. तिने सांगितलं होतं की, पती जनावरांप्रमाणे मारहाण करत होता. त्याच्या कुटुंबाला युक्ताचं चित्रपटात काम करणं पटत नव्हतं. जेव्हा प्रकरण न्यायालयात पोहोचलं तेव्हा दोघांनी एकमेकांच्या सहमती २०१४मध्ये घटस्फोट घेतला. युक्ता आता भारतात राहत असून झगमगत्या दुनियेपासून दूर आहे. माहितीनुसार, ती दिल्लीत स्वतःचं रेस्टॉरंट चालवत आहे.

Story img Loader