Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाला अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत. १२ जुलैला अनंत बोहल्यावर चढणार असून राधिका मर्चंटशी लग्नबंधनात अडकणार आहे. संपूर्ण देशभरातचं नव्हे जगभरात अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. काल, ८ जुलैला दोघांचा हळदी समारंभ पार पडला. ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरे यांचा संगीत सोहळ्यातील डान्स व्हिडीओ समोर आला आहे.

५ जुलैला अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. या संगीत सोहळ्यासाठी खास अंबानींनी जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स आयोजित केला होता. यासाठी अंबानींनी ८२ कोटी रुपये मोजले होते. जस्टिनच्या परफॉर्मन्स शिवाय बॉलीवूड सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स केला. सलमान खान अनंत अंबानीबरोबर ‘ऐसा पहिली बार हुआ है’ गाण्यावर डान्स करताना दिसला. तर रणवीर सिंह ‘इश्क दी गली विच नो एन्ट्री’ गाण्यावर थिरकला. या बॉलीवूड सेलिब्रिटींसह डान्स करताना तेजस ठाकरे देखील पाहायला मिळाले.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

हेही वाचा – Video: धर्मासाठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने वर्षभरानंतर लेकाची दाखवली पहिली झलक, पाहा गोंडस तारिक जमीलचा व्हिडीओ

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरेंनी रश्मी ठाकरेंबरोबर हजेरी लावली होती. या संगीत सोहळ्यासाठी तेजस यांनी खास लूक केला होता. शाही निळ्या रंगाचा सिल्कचा कुर्ता तेजस यांनी परिधान केला होता. ज्यावर त्यांनी कुर्त्याला मॅचिंग असा स्टोल घेतला होता. या संगीत सोहळ्यात तेजस अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे, ओरी यांच्याबरोबर डान्स करताना पाहायला मिळाले.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर तेजस ठाकरेंचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, शाहरुख खान व काजोलच्या ‘लडकी हाय अल्लाह’ या गाण्यावर तेजस ठाकरे थिरकताना दिसत आहेत. सारा, अनन्या, ओरी यांच्या ग्रुप डान्समध्ये तिसऱ्या रांगेत कोपऱ्यात तेजस ठाकरे डान्स करत आहेत. त्यांच्या या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’, अमृता खानविलकरचा छोट्या पुष्पाबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, १२ जुलैला शुभ मुहूर्तावर दुपारी ३ वाजता अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader