झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उत्तम कामगिरी केलेल्या स्त्रिया या कार्यक्रमात सहभागी होतात. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. इतर महिला आणि सुबोध भावे मिळून कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलेला प्रश्न विचारून बोलतं करतात. या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.

‘बस बाई बस’ कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना किशोरी पेडणेकरांनी अगदी दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरं देताना दिसल्या. प्रश्न विचारण्याबरोबरच या कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळही सहभागी महिलेसह खेळले जातात. यातीलच एक गमतीशीर खेळ म्हणजे गाण्याचे बोल ऐकून समोर कोणाचा चेहरा येतो ते मंचावरील स्त्रीला सांगायचे असते.किशोरी पेडणेकरांनाही काही गाणी ऐकवली गेली. यापैकी ‘कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू’ हे गाण्याचे बोल ऐकल्यानंतर कोण आठवलं, असं सुबोध भावेने त्यांना विचारलं. हे गाणं ऐकताच भाजपाच्या चित्रा वाघ यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याचं किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं.

हेही पाहा >> Photos: ‘क्या हुआ तेरा वादा’ला आठवले CM शिंदे, ‘दोस्त दोस्त ना रहा’वर फडणवीस तर ‘दिस येतील’वर…; किशोरी पेडणेकरांची भन्नाट निवड

हेही वाचा >> Video : दाक्षिणात्य पद्धतीने जेवण केल्यामुळे रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “कितीही स्टंट केले तरी…”

किशोरी पेडणेकरांना पुढे ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणंही ऐकवण्यात आलं. हे गाणं ऐकताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवल्याचे सांगितल्यावर एकच हशा पिकला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. किशोरी पेडणेकरांच्या या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बस बाई बस’ कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांच्या आधी भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही सहभागी झाल्या होत्या.

Story img Loader