१९९० च्या दशकातील दिवसांमध्ये हल्लीप्रमाणे विविध वाहिन्यांवरील मालिकांचा भरणा नसल्यामुळे दूरदर्शनवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या मालिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मालिकांचे कथानक, कलाकार इतकेच काय तर मालिकांच्या प्रसारित होण्याच्या वेळाही सर्वांच्याच अगदी तोंडपाठ होत्या. ९०च्या दशकात काही गाजलेल्या मालिकांपैकी अशीच एक मालिका म्हणजे ‘चंद्रकांता’. या मालिकेतून मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री शिखा स्वरुपने तिच्या रुपाने अनेकांनाच घायाळ केले होते. शिखाने साकारलेली ९०च्या दशकात काही गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘चंद्रकांता’. शिखाने साकारलेली ‘राजकुमारी चंद्रकांता’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मालिका प्रसारित होऊन इतकी वर्षे उलटूनही शिखाच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. ‘चंद्रकांता’ ही मालिका आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली असल्यामुळे अनेकांमध्ये पुन्हा एकदा शिखा स्वरुपविषयीच्या चर्चांना उधाण येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इतक्या वर्षांनंतर ही ‘राजकुमारी चंद्रकांता’ नेमकी कशी दिसत असेल याविषयी अनेकांच्या मनात कुतुहलाचे वातावरणही पाहायला मिळत आहे. तर आम्ही घेऊन आलो आहोत शिखाचे काही फोटो.

१९८८ मध्ये मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पुढील तीन वर्षे हा किताब शिखाकडेच होता. ऑल इंडिया पिस्टल चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटकवणारी शिखा एक चांगली बॅडमिंटनपटूही आहे. अभिनयासोबतच विविध क्षेत्रांमध्येही मोठ्या उत्साहाने सहभागी होणाऱ्या शिखाला खरी ओळख दिली ती म्हणजे ‘चंद्रकांता’ या मालिकेने. या मालिकेने बच्चे कंपनीसह कुटुंबातील थोर मोठ्यांनाही चांगलेच प्रभावित केल्याचे दिसून आले होते. लेखिका देवकी नंदन खत्री यांच्या कादंबरीच्या आधारावर ‘चंद्रकांता’ ही मालिका टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष दाखविण्यात आलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन सुनिल अग्निहोत्रीने केले होते. तर निरजा गुलेरी हिने मालिकेची निर्मिती केली होती.